वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड – निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन!
वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ही निवड ग्रामस्थांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी ठरली आहे. याप्रसंगी उपस्थित ग्रामसेवक गोविंदा काळे , सरपंच सौ. सुरेखा पवार , श्री पवन पवार, माजी उपसरपंच श्री.बाबुलाल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोकुळ राठोड , श्री. प्रकाश जाधव, अमोल राठोड तसेच तंटा मुक्ती अध्यक्ष प्रवीण वर्जन राठोड व अनेक मान्यवर उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून त्यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पंचक्रोशी न्यूज कडून श्री. विनायक राठोड यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आगामी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा!
panchkroshi news
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा